महाराष्ट्रराजनीतिराज्य
Trending
तुकाराम मुंढेंनी पुण्यातील रसायन कंपनीवर केलेल्या कारवाईच्या स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचा मंत्र्यांवर दबाव; रद्द केलेला परवाना पुन्हा बहाल केला, राष्ट्रवादी आणि कंपनीचा संबंध काय?
तुकाराम मुंढेंनी पुण्यातील रसायन कंपनीवर केलेल्या कारवाईच्या स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचा मंत्र्यांवर दबाव; रद्द केलेला परवाना पुन्हा बहाल केला, राष्ट्रवादी आणि कंपनीचा संबंध काय?
- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील मिथेनॉल कंपनीवर केलेली कारवाई रद्द करण्याच्या निर्णयावर राजकीय दबाव आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
मुंबई : पुण्यात मे महिन्यात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेत तब्बल 19 बळी गेल्यानंतर राज्यातील 70 मिथेनॉल उत्पादक कंपन्यांचे परवाने रद्द केले होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेतृत्वाच्या जवळच्या असलेल्या एका कंपनीच्या परवाना रद्दला स्थगिती देण्यासाठी विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर पक्ष नेतृत्वाकडून दबाव टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
- रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ही वादग्रस्त रसायन कंपनी आहे. गावठी दारूमध्ये मिसळण्यात येणाऱ्या मिथेनॉलची साठवणूक व विक्री संदर्भात राज्यातील सर्व 936 मिथेनॉल उत्पादक कंपन्यांची जून महिन्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. 309 कंपन्यांकडून गंभीर अनियमितता झाली होती. त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. 70 कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. त्यापैकी 22 कंपन्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या विरोधात मंत्री झिरवाळ यांच्याकडे अपील केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीशी जवळीक असणाऱ्या पुण्यातील या कंपनीचाही समावेश होता.
