क्राइमटॉप न्यूज़देशराजनीति
Trending

लॉरेन्स बिश्नोई साब”! पोलिसांकडून गँगस्टरच्या आदरार्थी उल्लेखावर अभिजीत दीपकेंची टीका

लॉरेन्स बिश्नोई साब”! पोलिसांकडून गँगस्टरच्या आदरार्थी उल्लेखावर अभिजीत दीपकेंची टीका

  • गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आदरार्थी उल्लेखावरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी टीका केली आहे.
  • गँगस्टरचा पोलिसांकडून आदरार्थी उल्लेख केल्यावरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी टीका केली आहे. वर्षभरापूर्वीचा दिल्ली पोलिसांच्या एका पत्रकार परिषदेचा व्हीडिओ दीपके यांनी शेअर केला.

  • तुम्ही विचारलेल्या प्रश्नासंदर्भात मी आता स्पष्टीकरण देऊ शकत नाही. पण मी हे सांगू शकतो यामध्ये जो मेसेज-कॉल होता त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई साब यांचं नाव घेतलं गेलं होतं’,असं दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. या व्हीडिओचा दाखला देत दीपके यांनी लिहिलं आहे. ते म्हणतात, गँगस्टरचा उल्लेख पोलिसांनी साब असा आदरार्थी केला आहे. गुन्हेगारांना जेवढा आदर दिला गेला त्याच्या १० टक्के विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांना देता आला असता. आम्ही फक्त आंदोलन करत होतो’, अशा शब्दांत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.
  • नीट परीक्षेतील गोंधळावरून कॉक्रोच पार्टीतर्फे राजधानी दिल्लीत आंदोलन करण्यात आलं. जंतरमंतर इथे अनेक दिवस चाललेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना-आंदोलकांना दिल्ली पोलिसांतर्फे जी वागणूक देण्यात आली त्यासंदर्भात दीपके यांनी भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. दीपके दिल्लीत विमानाने दाखल झाले. विमानातून बाहेर पडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर जंतरमंतर इथे पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करत आंदोलनकर्त्यांना घटनास्थळी पोहोचू दिलं नाही. आंदोलनकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवरून देअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी मुंबईत हल्ला झाला. टायगरला या हल्ल्यात दुखापत झाली नाही मात्र त्याचा गाडीचालक दुखापतग्रस्त झाला. टायगरनेच त्याला रुग्णालयात नेलं.  शभरातून टीका झाली होती.
  • या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडितने स्वीकारली आहे. पंडित आणि हरमन संधू यांनी हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे. टायगरशी याआधी संपर्क करण्यात आला होता मात्र त्याने इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं असं हल्लेखोरांचं म्हणणं आहे. गँगच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा सलमान खानबरोबर काम करणाऱ्या लोकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा गँगच्या वतीने देण्यात आला आहे.
  • दरम्यान टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्यांचे धागेदोरे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!