Welcome to HINDUSTHAN TV 9   Click to listen highlighted text! Welcome to HINDUSTHAN TV 9
क्राइममहाराष्ट्र
Trending

ब्लिंकीट, झेप्टो, इन्स्टासह १० आस्थापनांना दणका; FDAची कारवाई; बॉलीवूड कॅफेचाही समावेश

ब्लिंकीट, झेप्टो, इन्स्टासह १० आस्थापनांना दणका; FDAची कारवाई; बॉलीवूड कॅफेचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागाने राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ८६ आस्थापनांची तपासणी केली. यात अन्न सुरक्षा मानकांचे व स्वच्छतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून ६० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कारवाई केलेल्यांमध्ये मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेंटर्स आणि साठवणूक केंद्रांचा समावेश आहे.

गोरेगाव येथील फिल्म सिटीतील ‘बॉलीवूड कॅफे’सह ब्लिंकीट, झेप्टो, राजधी रिटेल (इन्स्टामार्ट) आणि भगवती स्टोअर्स या प्रमुख आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत १० ऑनलाइन फूड डिलिव्हरी आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर १४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

खाद्यपदार्थ जमिनीवर

 

स्टोरेज रॅक अस्वच्छ आणि भिंतीपासून योग्य अंतरावर नसणे, खाद्य व गैर-खाद्य पदार्थांचे योग्य विभाजन नसणे, कुजलेल्या भाज्या, अस्वच्छ परिसर, झुरळांचा प्रादुर्भाव, खराब सीलिंग व फ्लोअरिंग, टॉयलेटचा दरवाजा उघडा असणे तसेच एफएसएसएआय परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित न करणे, आवश्यक वैद्यकीय तपासणी अहवाल आणि पिण्याच्या पाण्याचा तपासणी अहवालही उपलब्ध नसणे, खाद्यपदार्थ जमिनीवर व अव्यवस्थितपणे ठेवणे अशा त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत.

पार्ले ॲग्रोचा परवाना केला निलंबित

 

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) चेंबूर नाका येथील ‘पार्ले ॲग्रो’ ब्रँडच्या व्हेलॉसिटी एक्सप्रेस वेअरहाऊस, चेंबूर या गोदामावर धाड टाकली. या धाडीत मुदत संपलेल्या पदार्थांचा साठा आढळल्याने हा साठा जप्त करण्यात आला. त्यासोबत परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत एफडीएने मुदत संपलेल्या ॲपल फिज, फ्रुटी, अॅपल ज्यूस आदी ९९ हजार ९७० रुपयांचा साठा साठा जप्त केला आहे. चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील एल. यु. गडकरी मार्गावरील प्रयाग नगरमधील गोदामावर ही कारवाई करण्यात आली. एफडीएने हे गोदाम सील करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!