- खुलना शहर महापालिकेने पंतप्रधान तारिक रहमान यांच्या खुलना दौऱ्यापूर्वी ही चित्रे तयार करून घेतली होती.
- ढाका :बांगलादेशातभारतीय नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या भित्तिचित्राची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली. खुलना रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या त्यांच्या चित्रावर काळी शाई टाकण्यात आली. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्राजवळ भारतविरोधी मजकूर असलेली दोन पोस्टर्सही लावण्यात आली होती.
- या भिंतीवर खुलना परिसरातील कला, साहित्य आणि संस्कृतीत योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांची चित्रे आहेत. त्यामध्ये फकीर लालन शाह, चित्रकार एस. एम. सुलतान, काझी नजरूल इस्लाम, माजी पंतप्रधान खालिदा झिया, माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि मायकेल मधुसूदन दत्त यांचाही समावेश आहे.
पोस्टरमधूनही दिला भारतविरोधी संदेश
-
-
टागोर यांच्या चित्राजवळ लावलेल्या एका पोस्टरवर, ‘तितुमीर यांच्या बंगालमध्ये टागोर यांच्यासाठी जागा नाही. मुस्लीम आणि पूर्व बंगालच्या विरोधात असणाऱ्यांना येथे स्थान नाही. भारताचे गौरवगान करणाऱ्यांनाही येथे जागा नाही,’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. खुलना शहर महापालिकेने पंतप्रधान तारिक रहमान यांच्या खुलना दौऱ्यापूर्वी ही चित्रे तयार करून घेतली होती. विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये ढाका येथेही टागोर यांच्या एका भित्तिचित्राची विटंबना करण्यात आली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते.
-



