Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
Sanjay Raut on PM modi : 17 सप्टेंबर नंतर तुम्हाला कळेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय होईल? त्यांना काय प्रसंगांना समोरे जावं लागेल, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

दिल्लीमध्ये काल (बुधवारी, ता19) काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती असल्याचे वृत्त समोर आलं आहे. या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती आहे. यावरती आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले, मग मी गेले काही दिवस झाले काय सांगतो आहे, राहुल गांधींचं माझं एकमत आहे या विषयावर, मला माहिती आहे ना, गेले काही महिने मी हेच सांगतोय की, हे महाशय जे आहेत प्रधानमंत्री सध्या, ते त्यांची टर्म पूर्ण करत नाहीयेत. त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावे लागत आहे, तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर या गोष्टीचा उलगाडा होईल, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री म्हणून तो शेवटचा वाढदिवस असेल
17 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आहे, काय आहे, खूप अभ्यास करून इथे उभं रहावं लागत आम्हाला, 17 सप्टेंबर नंतर असं काय होईल ते कळेल, 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा प्रधानमंत्री म्हणून तो शेवटचा वाढदिवस असेल, तो त्यांनी आंनदांत साजरा करावा, त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्ताने उड्या माराव्यात, गाणं बिनं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री, नंतर पुढल्या प्रसंगाला त्यांनी सामोर जावं, अमित शाह कधीच प्रधानमंत्री होणार नाहीत, मोदी गये तो अमित शाह भी गये, हैं क्या, एकावर एक फ्री आहेत ना ते, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
लाल किल्ल्यावर त्यांचे प्रधानमंत्री म्हणून शेवटचे भाषण आहे
तर यंदाचा पंतप्रधान पदी असताना मोदींचा हा शेवटचा वाढदिवस आहे, तो पंतप्रधान पदाचा त्यांच्या कार्यकाळातला शेवटचा वाढदिवस आहे, असं हे माझं मत आहे. माझ्याकडे जे काय आकलन आहे, किंवा राहुल गांधी जे सांगतात, आम्ही जी काही चर्चा करतो, आमच्या समोर जे काही तथ्य येतात, जसं आम्ही म्हणालो की, लाल किल्ल्यावर त्यांचे प्रधानमंत्री म्हणून शेवटचे भाषण आहे, तसं हा प्रधानमंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल, हे जवळजवळ जागतिक स्तरावरच मी चित्र सांगतोय, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

