Welcome to HINDUSTHAN TV 9   Click to listen highlighted text! Welcome to HINDUSTHAN TV 9
महाराष्ट्र
Trending

एफडीएच्या कारवाईनंतर चायनीज पदार्थाच्या रंगांसाठी लाल मिरची, बिट

एफडीएच्या कारवाईनंतर चायनीज पदार्थाच्या रंगांसाठी लाल मिरची, बिट

आरोग्यास घातक ठरणाऱ्या कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक पर्यायांना चायनीज व्यावसायिकांची पसंती

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यानंतर ठाण्यातील चायनीज विक्रेत्यांनी कृत्रिम रंगांऐवजी बीट आणि मिरचीचा वापर सुरू केला आहे.(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त पदार्थ तसेच कृत्रिम रंगांचा वापर करून अन्नपदार्थ तयार करण्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईच्या भीतीने ठाणे शहरातील अनेक चायनीज विक्रेत्यांनी आता अन्न पदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरणे बंद केले असून त्याऐवजी अन्न पदार्थांना रंग येण्याकरीता बिट आणि लाल मिरचीचा वापर सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

यानिमित्त आरोग्यास घातक असलेले कृत्रिम रंग वापरून केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांना आळा बसल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील रस्ते, पदपथांवर तसेच आस्थापनांत चायनीज दुकाने थाटण्यात आलेली आहेत. याठिकाणी अन्नपदार्थ तयार करताना कृत्रिम रंग वापरला जातो. यामुळे अन्नपदार्थांना लाल रंग येतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा चायनीज विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. यात चायनिज पदार्थांची विशेष तपासणी केली जात आहे. यासोबतच पदार्थांमध्ये कोणते घटक वापरावे आणि कोणते टळावे याबाबत विक्रेत्यांना प्रशिक्षिण दिले जात आहे.

या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त पराग नलावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कृत्रिम खाद्यरंगासह अजिनामोटो व सिझनिंग पावडरच्या वापरावरही निर्बंध लावण्यात आले आहेत, अशी माहिती चायनिज विक्रेते सचिन आढाळ यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!