Welcome to HINDUSTHAN TV 9   Click to listen highlighted text! Welcome to HINDUSTHAN TV 9
क्राइममहाराष्ट्र
Trending

Dhiraj Pardeshi : अहिल्यानगर धीरज परदेशी प्रकरण; आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस, 10 दिवसांची पोलीस कोठडी, पत्नीची मोठी मागणी

Dhiraj Pardeshi : अहिल्यानगर धीरज परदेशी प्रकरण; आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस, 10 दिवसांची पोलीस कोठडी, पत्नीची मोठी मागणी

Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case Encroachment Notice to Accused Home : अहिल्यानगरमध्ये सध्या तापलेलं प्रकरण म्हणजे विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण. आता या प्रकरणातील तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस चिपकवल्या आहेत.

अहिल्यानगर : महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचारादरम्यान काल रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.

अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या

जिथे मारहाण झाली, तिथेच अंत्यविधी करा; पत्नीची मागणी

धीरज परदेशी यांच्या पत्नीनं अत्यंत संतप्त मागणी केली आहे. ‘माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली, त्याच कब्रस्तानात त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढलं असून, प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

.नोटिशीत नेमकं काय?

जिथे मारहाण झाली, तिथेच अंत्यविधी करा; पत्नीची मागण

आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी

धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर न्यायालयानं तिन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून, हल्ल्यामागील नेमकं कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील?

 

धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्यानं प्रशासनानं कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे. आता नोटीस बजावण्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगानं पुढं जातं, याकडं अहिल्यानगरकरांचं लक्ष लागलं आहे.

जिथे मारहाण झाली, तिथेच अंत्यविधी करा; पत्नीची मागणी

धीरज परदेशी यांच्या पत्नीनं अत्यंत संतप्त मागणी केली आहे. ‘माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली, त्याच कब्रस्तानात त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढलं असून, प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!