क्राइममहाराष्ट्रयुवा
Trending
Shendurwada News : आयुष्य संपविण्यापूर्वी व्हिडिओतून मांडली व्यथा; मांडव्यात ३३ वर्षीय युवकाने संपविले जीवन
Shendurwada News : आयुष्य संपविण्यापूर्वी व्हिडिओतून मांडली व्यथा; मांडव्यात ३३ वर्षीय युवकाने संपविले जीवन
- शेंदूरवादा – गंगापूर तालुक्यातील मांडवा येथे ३३ वर्षीय युवकाने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आली. सखाराम गोरख आदमाने असे मृत युवकाचे नाव असल्याचे समजते.
- मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम आदमाने हे सकाळच्या सुमारास घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. गावातील नानासाहेब आदमाने व सुधीर आदमाने यांनी त्यांना तातडीने खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
- दरम्यान, हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सखाराम आदमाने यांनी एक व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्यावर व पत्नीवर गावातीलच काही व्यक्तीकडून त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ये-जा करण्याचा रस्ता बंद केल्यानेही आपला छळ होत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. याच त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटल्याची माहिती आहे.
