महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़
Trending

चिंचवडसाठी आमदार शंकर जगताप यांचा ‘झिरो गार्बेज’ प्रोजेक्ट

चिंचवडसाठी आमदार शंकर जगताप यांचा ‘झिरो गार्बेज’ प्रोजेक्ट

  • प्रशासनाला दिला स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती आणि वाहतूक व्यवस्थेचा कृती आराखडा…
  • पिंपरी चिंचवड (दि. 08 ऑक्टोबर 2026) :- चिंचवड मतदारसंघातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच कचरा, अतिक्रमणे, अनधिकृत फलक, आठवडे बाजार आणि हॉकर्सच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाला कृती आराखडा निश्चित करुन दिला. चिंचवड मतदारसंघ ‘झिरो गार्बेज झोन’ करण्याचा निर्धार करत, वारंवार कचरा साचणारे ‘क्रॉनिक स्पॉट’ शोधून ते कायमस्वरूपी कचरामुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.
  • आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. ८) चिंचवड मतदारसंघातील विविध नागरी प्रश्नांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी स्वच्छता, अतिक्रमण, हॉकर्स झोन आणि आठवडे बाजारांच्या नियोजनाचा आढावा घेत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला ड व ज क्षेत्रीय कार्यालयाच्या अश्विनी गायकवाड, ह क्षेत्रीय कार्यालयाचे संतोष कोराड, ग क्षेत्रीय कार्यालयाचे मुकेश कोळप आणि ब क्षेत्रीय कार्यालयाचे गोरखनाथ निम्हण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!