टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्य
Trending

सातारा

सातारा

  • कास परिसरातील अधूनमधून पावसाची संततधार गेली सव्वादोन महिने १५ सप्टेंबरपर्यंत सलग ओव्हरफ्लो झालेले कास धरण यंदा जुलै महिन्यात मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन कास धरण ६ जुलैला ओव्हरफ्लो झाले होते. ६ जुलैपासून १५ सप्टेंबरपर्यंत सलग सव्वादोन महिन्यांपासून कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच होते.

 

  • एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. यंदा कास परिसरातही नेहमीसारखा पाऊस पडला नाही. परिणामी यामुळे कास पठारावरील फुलांनाही याचा फटका बसला तसेच गतवर्षी चार महिने वाहणारा कासचा सांडवा यंदा सव्वादोन महिनेच वाहिल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवू शकते. यापुढे पावसाचे गणित बिघडल्यास पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावून भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!