देशमहाराष्ट्रयुवाराज्य
Trending

Suraj Chavan Daughter Video: घराचं गोकुळ झालं! सूरज चव्हाणच्या घरी आली लक्ष्मी, लाडक्या लेकीचं केलं थाटामाटात स्वागत

Suraj Chavan Daughter Video: घराचं गोकुळ झालं! सूरज चव्हाणच्या घरी आली लक्ष्मी, लाडक्या लेकीचं केलं थाटामाटात स्वागत

Suraj Chavan Daughter Welcome Video:टिकटॉक स्टार आणि बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. त्यानं शेअर केलेला एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई:’बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आणि लोकप्रिय सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण च्या घरात आनंदाचं वातावरण आहे. सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न झालं असून, सूरजच्या घरी या चिमुकल्या लक्ष्मीचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं.

या चिमुकल्या पाहुणीच्या स्वागताचा आणि तिची पहिली झलक दाखवणारा खास सूरजनं इन्स्टाग्रावर शेअर केलाय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूरजनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लेकीच्या स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूरज आपल्या नवजात बाळाला घेऊन प्रचंड भावुक झालेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यांतील अश्रू पाहून त्याच्या चाहत्यांचेही मन भरून आल्याचं पाहायला मिळत आहे.

 

कुटुंबातील सदस्यांनी चिमुकलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. त्याचं घर फुगे, फुलांनी, सजवलं आहे. सुंदर रांगोळीही व्हिडिओत काढल्याचं दिसून येतंय.

कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी झालेला लेकीचा जन्म

 

संजनानं कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी या चिमुकल्या परीला जन्म दिला. या यानंतर सूरजची ‘बिग बॉस’मधील सहकलाकार आणि बहीण मानलेली जान्हवी किल्लेकर हिनं देखील रुग्णालयात जाऊन बाळाची भेट घेतली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!