Thalapathy Vijay’s Fitness: ना कोणती कडक डाएट, ना उपवास; ट्रेनर नरेश कुमार यांनी केला थलपती विजय यांच्या रोजच्या जेवणाचा अन् फिटनेसचा खुलासा!
- Thalapathy Vijay’s Daily Fitness Diet: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकीय नेते थलपती विजय (Thalapathy Vijay) हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि अद्भूत डान्स मूव्ह्ससोबतच त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही, म्हणजेच वयाच्या ५२ व्या वर्षीही ते प्रचंड फिट अन् तरुण दिसतात.
- अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो की विजय इतके कडक डाएट फॉलो करतात का? पण, त्यांचे वैयक्तिक फिटनेस ट्रेनर नरेश कुमार (Naresh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कोणतेही अत्यंत कडक (Restrictive) डाएट पाळत नाहीत. ते अत्यंत साधे, घरगुती आणि ‘पोर्शन कंट्रोल’ (Portion Control – मर्यादित प्रमाणात खाणे) या सूत्रावर आधारित अन्न घेतात.
- थलपती विजय यांचा दैनंदिन आहार
- ट्रेनर यांच्या मते, विजय रोज सकाळी ५:३० ते ६:०० च्या दरम्यान उठतात. शूटिंग असो किंवा राजकीय दौरे, ते बाहेरचे किंवा जंक फूड खाणे पूर्णपणे टाळतात आणि स्वतःच्या घरातून आणलेले जेवणच सोबत ठेवतात.
नाश्ता (Breakfast – सकाळी ९:०० वाजता)
विजय यांच्या नाश्त्यामध्ये प्रामुख्याने २ इडली आणि अंडी (Eggs) यांचा समावेश असतो.
‘बिजिल’ (Bigil) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या नाश्त्यामध्ये विशेष हिरव्या भाज्यांचाही समावेश करण्यात आला होता.

लाइफस्टाइल
वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!
Thalapathy Vijay’s Fitness: ना कोणती कडक डाएट, ना उपवास; ट्रेनर नरेश कुमार यांनी केला थलपती विजय यांच्या रोजच्या जेवणाचा अन् फिटनेसचा खुलासा!
Thalapathy Vijay’s Fitness Secret
Thalapathy Vijay’s Fitness Secret
Thalapathy Vijay’s Daily Fitness Diet: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकीय नेते थलपती विजय (Thalapathy Vijay) हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि अद्भूत डान्स मूव्ह्ससोबतच त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही, म्हणजेच वयाच्या ५२ व्या वर्षीही ते प्रचंड फिट अन् तरुण दिसतात.
अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो की विजय इतके कडक डाएट फॉलो करतात का? पण, त्यांचे वैयक्तिक फिटनेस ट्रेनर नरेश कुमार (Naresh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कोणतेही अत्यंत कडक (Restrictive) डाएट पाळत नाहीत. ते अत्यंत साधे, घरगुती आणि ‘पोर्शन कंट्रोल’ (Portion Control – मर्यादित प्रमाणात खाणे) या सूत्रावर आधारित अन्न घेतात.
थलपती विजय यांचा दैनंदिन आहार
ट्रेनर यांच्या मते, विजय रोज सकाळी ५:३० ते ६:०० च्या दरम्यान उठतात. शूटिंग असो किंवा राजकीय दौरे, ते बाहेरचे किंवा जंक फूड खाणे पूर्णपणे टाळतात आणि स्वतःच्या घरातून आणलेले जेवणच सोबत ठेवतात.
नाश्ता (Breakfast – सकाळी ९:०० वाजता)
विजय यांच्या नाश्त्यामध्ये प्रामुख्याने २ इडली आणि अंडी (Eggs) यांचा समावेश असतो.
‘बिजिल’ (Bigil) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या नाश्त्यामध्ये विशेष हिरव्या भाज्यांचाही समावेश करण्यात आला होता.


