टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराज्य
Trending
एफडीए अधिकाऱ्यांची वरकमाई कमी कशी होणार?; कार्यपद्धतीत अमुलाग्र बदलाची गरज
एफडीए अधिकाऱ्यांची वरकमाई कमी कशी होणार?; कार्यपद्धतीत अमुलाग्र बदलाची गरज
- एफडीए अधिकाऱ्यांना जनमानसातील प्रतिमा सुधारण्याची दुर्लभ संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा उपयोग केल्यास महाराष्ट्र एफडीएची तुलना अमेरिकन एफडीएशी नक्कीच होऊ शकेल.

- उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना, त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबद्दल पत्र दिले आहे. मुंढे यांनी या विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ऍनालॉग पनीर, दुधासह आपण भेसळीचे कोणकोणते पदार्थ खात होतो याची जाणीव मुंढे यांच्या कारवायांनंतर महाराष्ट्राला झाली. त्याबद्दल मुंढेंचे अभिनंदन करताना खा. राऊत यांनी एफडीएमध्ये काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांविषयी अनेक गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. असे असले तरी गेल्या काही महिन्यांत मुंढे यांच्या कारवायांमुळे सरकारची प्रतिमा निश्चित चांगली झाली आहे. जनतेला भेसळयुक्त खाद्य मिळू नये. त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मुंढे यांचे कष्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ यामुळे सरकार एफडीएच्या क्षेत्रात चांगले काम करत असल्याचा मेसेज देशभर गेला आहे. एफडीए अधिकाऱ्यांना जनमानसातील प्रतिमा सुधारण्याची दुर्लभ संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा उपयोग केल्यास महाराष्ट्र एफडीएची तुलना अमेरिकन एफडीएशी नक्कीच होऊ शकेल.
- काही वर्षांपूर्वी लोकमतने एफडीएमध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचारावर मालिका प्रसिद्ध केली होती. त्यावेळच्या सरकारने तत्कालीन आयुक्त महेश झगडे, ऍड. उदय बोपशेट्टी आणि संजय काळे या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली गेली. त्यांनी दिलेला रिपोर्ट एफडीएसाठी भगवद्गीता म्हणता येईल. सिस्टीम कशी तोडली जात आहे यावर त्या समितीने लक्ष केंद्रित केले होते. वर्षानुवर्षे या विभागात ठराविक शहरांमध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी त्या अहवालानंतर बदलले गेले अनेकांना मुंबई, ठाणे, पुणे या भागातच पोस्टिंग का पाहिजेत याचे उत्तर तो अहवाल देत होता. मधल्या काळात मॅटचे प्रमुख माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी देखील याच अहवालाचा आधार घेऊन अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप लावला होता.

