क्राइमटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्य
Trending

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

  • Sachin Vaze Granted Bail: अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका करण्यात आली आहे.


  • मुंबई : नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अचक करण्यात आली होती. मात्र आता अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझे यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • मिळालेल्या माहितीनुसार, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील एनआयएच्या गुन्ह्यात वाझेंना हा जामीन देण्यात आला आहे. मात्र या जामिनासाठी १ लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि स्थानिक जामीनदाराची अट ठेवण्यात आली आहे.

  • पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश

सचिन वाझेंना पासपोर्ट असल्यास तो एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे पुरावे नोंदवले जाईपर्यंत वाझेंना मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या हद्दीत राहता किंवा प्रवेश करता येणार नाही…


 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!