टॉप न्यूज़महाराष्ट्र
Trending
आरोग्य विभागातील पदभरती, पदोन्नतीला गती; मनुष्यबळाच्या कमतरतेवर तातडीने उपाययोजना करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
आरोग्य विभागातील पदभरती, पदोन्नतीला गती;
राज्यातील आरोग्य व्यवस्थेला गती देण्यासाठी प्रलंबित पदभरती आणि पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवनातील बैठकीत दिले.
- मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापनाविषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.
आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


