Welcome to HINDUSTHAN TV 9   Click to listen highlighted text! Welcome to HINDUSTHAN TV 9
Uncategorized

तेली समाजाचा बाणवकुळेंच्या वक्तव्याचा तीव्र निषेध ‘अपशब्द वापरणाऱ्यांनी संयम पाळावा’; महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभेचा इशारा

तेली समाजाचा बाणवकुळेंच्या वक्तव्याचा तीव्र निषेध ‘अपशब्द वापरणाऱ्यांनी संयम पाळावा’; महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभेचा इशारा

अपशब्द वापरणाऱ्यांनी संयम पाळावा

 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा

 

अकोले, ता. 11 ः आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मनोज जरांगे यांनी केलेल्या आक्षेपार्ह व मर्यादाभंग करणाऱ्या वक्तव्यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला, तरी व्यक्तीचा अवमान करणारी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महासभेने दिला आहे.

 

सार्वजनिक जीवनात शासनाच्या धोरणांवर, निर्णयांवर किंवा सार्वजनिक व्यक्तींच्या भूमिकेवर टीका करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. मात्र, टीका आणि व्यक्तिगत अवमान यातील सीमारेषा ओलांडणे योग्य नाही. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या वक्तव्यांना विरोध करणे आवश्यक असल्याचे महासभेने म्हटले आहे.

 

लोकशाहीमध्ये राजकीय मतभेद आणि संघर्ष असणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणत्याही नेत्याविषयी अशोभनीय, असभ्य किंवा अपमानकारक भाषा वापरून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लोकशाही व संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडत असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल. सार्वजनिक जीवनात मतभेद असले, तरी व्यक्तीचा सन्मान राखणे हीच लोकशाहीची खरी संस्कृती असल्याचे महासभेने म्हटले आहे. हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे.

 

विभागीय तैलिक महासभेच्या महिला अध्यक्षा विद्या करपे, रवींद्र करपे, चमन घाटकर, उपाध्यक्ष बापू काळे, सरपंच संतोष बनसोडे, किशोर काळे, अशोक शिंदे, विनायक घाटकर, शेखर वाळझाडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!