टॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्य
Trending
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
- Nana Patekar Prayer Meet: सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांना मोठा धक्का बसला. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचं निधन झालं असलं तरी, नाना आपल्या आरोग्याची खूप काळजी घेत असत. अचानक त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे सिने कलाकार तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. 14 ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रार्थनासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. अनेकांनी नानांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या. सिने कलाकार (Marathi Actors) तसेच चाहत्यांनी या सभेत उपस्थित राहून नानांच्या आठवणींना (Nana Patekar Death) उजाळा दिला. तसेच नाना पाटेकर यांना श्रध्दांजली वाहिली. सध्या यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

- नाना पाटेकर यांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं होतं? (Varsha Usgaonkar Shivaji Satam and Others Pay Tribute to Nana Patekar)
- दिवंगत अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर प्रार्थना सभेत मराठी सिनेइंडस्ट्रीतील नामांकित दिग्गज कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यासह CID फेम शिवाजी साटम हे देखील उपस्थित होते. दोन्ही कलाकारांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच नाना पाटेकर यांना श्रध्दांजली वाहिली. यांचे व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. केवळ मराठी इंडस्ट्रीतील कलाकार नाही तर, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे देखील उपस्थित होते.

