Welcome to HINDUSTHAN TV 9   Click to listen highlighted text! Welcome to HINDUSTHAN TV 9
Uncategorized
Trending

तळवडे व निगडी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला साजरा तळवडे व निगडी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला साजरा

तळवडे व निगडी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला साजरा तळवडे व निगडी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला साजरा

निगडी, ता.१६ : रुपीनगर, तळवडे, निगडी, प्राधिकरण भागांत देशाचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदन, रक्तदान शिबिर, सांगीतिक अभिवाचन आदींचा समावेश होता.

तळवडे गावठाणात किसन अंतुजी भालेकर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, शीतल वर्णेकर, धनंजय भालेकर, शांताराम भालेकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचालन सादर केले.

 

रक्तदान शिबिर

रुपीनगर येथे दक्षता मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये एकूण ९२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळाचे कार्यकर्ते सभासद, रूपीनगरमधील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. श्वास फाऊंडेशन, करमाळा रक्तपेढीच्या सहकार्याने गौरी भिलारे, अभिमान खेडकर यांनी संयोजन केले.

 

ज्येष्ठ नागरिकांकडून ध्वजवंदन

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या दादादादी विरंगुळा केंद्र निगडी येथील नवीन वास्तू समोर स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्व संघातील आजी-माजी अध्यक्ष तसेच सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. कविता, देशभक्तिपर गीतांमुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. सर्वांना पेढे, अल्पोपहार देण्यात आला.

 

ज्ञानप्रबोधिनीत अभिवाचन

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या अध्यापकवृंदाने ‘कथा स्वातंत्र्यलढ्याची’ हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उमाजी नाईक यांचा लढा, १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध, जालियनवाला बाग हत्याकांड, बंगालची फाळणी अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना व व्यक्ती यांच्याविषयीचे अभिवाचन केले. तसेच विविध देशभक्तिपर पद्यांचे सुरेल गायन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!