SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?

Gyanesh Kumar: अंतर्गत बंडाळीच्या दाव्यांदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी हे बैठकीला उपस्थित होते.
Gyanesh Kumar: चौफेर गंभीर आरोपांनी घेरलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने कामकाजाशी संबंधित अनेक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. काल शनिवारी झालेल्या आयोगाच्या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले, ज्यात मतदार सुनावणी, आयटी प्रणाली, अधिकाऱ्यांचा परदेश प्रवास आणि आयोगाच्या बैठकीच्या कार्यपद्धतीशी संबंधित बदलांचा समावेश आहे. अंतर्गत बंडाळीच्या दाव्यांदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी हे बैठकीला उपस्थित होते. आयोगाने SIR संबंधित निर्णय एकमताने घेण्यात आल्याचा दावा केला.
दुसरीकडे, इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, गेल्या 10 महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर 14 वेळा आक्षेप घेतला होता, परंतु कोणतीही सुनावणी झाली नाही. या वृत्तानंतर आयोगाने हे निवेदन जारी केले आहे. सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांना पाठवलेली पत्रे प्रतिनियुक्त अधिकाऱ्याशी संबंधित होती, असा दावा आयोगाने केला. दुसरीकडे, इंडियन एक्सप्रेसने दावा केला आहे की, संधू आणि जोशी यांनी त्या आदेशाला आक्षेप घेतला होता, ज्यामध्ये मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, वगळणे आणि अद्ययावत करण्याचे अधिकार केंद्रीय स्तरापुरते मर्यादित ठेवण्याचा धोका होता.
